८ डिसेंबर २०१० रोजी. मराठी अभ्यास केंद्र, ग्राममंगल, शिक्षण हक्क समन्वय समिती, समर्थ भारत व्यासपीठ आणि मराठी एकजूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ' लढा मराठी शाळांचा ' ही राज्यव्यापी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने प्रा. वीणा सानेकर यांची ' लढा मराठी शाळांचा ' ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली. ह्या पुस्तिकेबाबत आणि एकुणच मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल तसेच समाजाच्या बदलत्या मानसिकतेतही मराठी शाळांच्या गरजेबद्दल प्रा. वीणा सानेकर यांनी सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली.