दूरदर्शनवरच्या अमृतवेल या कार्यक्रमात मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसमोरील प्रश्न व त्यांच्या सोडवणुकीसाठी मराठी अभ्यास केंद्र करत असलेले प्रयत्न याबद्दलची सविस्तर मुलाखत संजय भुस्कुटे यांनी घेतली होती. त्यानिमित्ताने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक दीपक पवार यांची याबद्दलची भूमिका सविस्तरपणे पाहता व ऐकता येईल. राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुरू झालेला मराठी भाषा विभाग वर्षभरातच मृतावस्थेत पोचला आहे, शिक्षणाचं माध्यम, न्यायव्यवहार, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान व व्यापाराची भाषा म्हणून मराठीचा ऱ्हास होतो आहे. त्याविरूद्ध मराठीकारणाची भूमिका असणारा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा उभारला पाहिजे अशी आग्रही भूमिका या मुलाखतीत मांडली आहे.