महाराष्ट्र व देशपातळीवरील राजकीय प्रश्नांवरील चर्चांचे कार्यक्रम विविध वृत्तवाहिन्यांवर होतात .त्यापैकी झी चोवीस तास या वाहिनीवरचा 'रोखठोक' हा चर्चात्मक कार्यक्रम महत्वाचा आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी' या प्रतिमेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेव्हा झालेल्या वादाच्या निमित्ताने झालेल्या 'रोखठोक' या कार्यक्रमातील मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार व राजकीय व विश्लेषक यांची याबद्दलची भूमिका सविस्तरपणे पाहता व ऐकता येईल.