१) भाजपामधील प्रभावशाली ओ.बी.सी. नेते गोपीनाथ मुंडे आणि पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यात महाराष्ट्र भाजपावरील चर्चेसाठी वेळोवेळी संघर्ष झाला आहे. यावेळेस मुंडे यांना पक्षातील विरोधकांनी कात्रीत पकडल्यामुळे ते पक्ष सोडून जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पक्षाचे तर नुकसान झाले असते. तसेच ती मुंडे यांची राजकीय आत्महत्या झाली असती. यानिमित्ताने झी २४ तास वरील 'रोखठोक' या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत मी भाजपाच्या राजकारणाचे विश्लेषण दिले आहे.