छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्यांची मालकी कोणत्या जातीकडे आहे हा वादाचा मुद्दा झाला आहे. इतिहासाची ब्राम्हण व ब्राम्हणेतर मीमांसा आणि त्याचे राजकीयीकरण हा यातला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे एखाद्या कुत्र्याची समाधी हा देखील सामाजिक संघर्षाचा विषय होऊ शकतो. या चर्चेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचे सध्याच्या राजकारणातील माझी मते मांडली आहेत.